Random Video

प्रदुषणात अशी राखा त्वचा आणि केसांची निगा | Beauty Tips Latest News

2021-09-13 21 Dailymotion

सध्या भारतातील बऱ्याच ठिकाणांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे. या वातावरणात त्वचा आणि केसांच्या आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे.
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते अशा दिवसांत केस आणि त्वचा उन्हापासून खराब होतातच, त्याचंसोबत हवेतील कणांमुळे देखील खराब होतात. हवेतील हे सूक्ष्मकण त्वचेत जातात आणि त्वचेला हानी पोहोचवतात. शिवाय युव्ही किरणं देखील त्वचेसाठी घातक असतात. यामुळे कॅन्सर होण्याचा धोका संभवतो. प्रदूषणामुळे केसगळतीची समस्या उद्भवू शकते. यासाठी केस धुतल्यानंतर केसांना सिरम लावणं गरजेचं आहे. पुरळ येणं, अॅलर्जी, त्वचेला सुरकुत्या पडणं त्वचेतील आर्द्रता कमी होणं मेकअप किंवा इतर उत्पादनांमुळे त्वचेला हानी पोहोचू शकते.त्वचेसाठी बदाम आणि ओट्स यांची पेस्ट करून लावा. जेणेकरून त्वचेला मॉईश्चराईज करता येईल.योग्य आहार घ्या. भरपूर पाणी प्या.त्वचेला सनस्क्रीन लावा.घट्ट कपडे घालू नका, संपूर्ण हात झाकले जातील असे कपडे घाला.प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या केसांविषयी समस्या आणि त्यावरील उपाय मॉईश्चराईज कमी झाल्याने केसांचं नुकसान होतं. केसांमध्ये कोंडा होतो. केसांना फाटे फुटतात. केसांसाठी योग्य त्या शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करा.बाहेर पडताना केस उघडे ठेवू नका.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews